पुण्यातील चिंचवड परिसरात 19 वर्षाच्या तरुणाकडून 12 वर्षाच्या मुलीवर ‘बलात्कार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड येथे खेळत असलेल्या १२ वर्षाच्या चिमुरडीवर तू मला खूप आवडते, असे सांगून एका १९ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अदित्य युवराज पवार (वय १९, रा. विद्यानगर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी मुलीच्या ३२ वर्षीय आईने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही १२ वर्षाची मुलगी घराच्या पाठीमागे खेळत होती. त्यावेळी अदित्य पवार हा तिथे आला व त्याने या मुलीला तू मला आवडते, असे म्हणून ओळख निर्माण केली. तिला त्याने पळवून नेऊन खदानीमध्ये तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार दोन तीन वेळा झाला. याची माहिती तिच्या आईला मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अदित्य पवार याला अटक केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like