शिपायाकडून 12 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रेसिडेन्शियल हायस्कूलमधील शिपायाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी शिपायविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, 12 वर्षीय विद्यार्थिनी रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे शिक्षण घेते. तेथे काम करणारे शिपाई लगड (पूर्ण नाव माहित नाही) यांनी सदर विद्यार्थिनीशी दोन वेळेस लज्जास्पद वर्तन केले. काल दुपारी शिपाई लगड यांनी लज्जास्पद वर्तन केल्यानंतर मुलीने घडलेली हकीकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर रात्री उशिरा पीडित मिलीची आई व नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तोफखाना पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिपाई लगड (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत. रेसिडेन्शिअल या नामांकित विद्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like