112 वर्षांच्या आजोबांनी सांगितलं निरोगी राहण्याचं ‘गुपित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने निरोगी राहण्याचे गुपित सांगितले आहे. 112 वर्षांच्या चित्तेसु वतनबे यांचे मत आहे की, जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर तुमच्या चेहर्‍यावर हसू दिसले पाहिजे आणि कधीही रागाऊ नका. वतनबे जपानमधील रहिवाशी आहेत आणि यावेळेला जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यांचे वय 112 वर्षे 344 दिवस आहे.

गिनिज बुकमध्ये नावाची नोंद
चित्तेसु वतनबे यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मोठ्या आयुष्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रागावर नियंत्रण केले पाहिजे आणि कोणत्याही स्थितीत चेहर्‍यावर हसू कायम ठेवले पाहिजे. वतनबे यांना त्यांच्या घरी येऊन गिनिज वर्ल्ड रिकॉर्डने जगातील सर्वात वयस्कर व्यक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे. ते 1907 मध्ये उत्तर जपानमध्ये जन्मले आहेत.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने चित्तेसु यांना त्यांच्या निगाटा येथील घरी जाऊन जगातील सर्वात वयस्कर असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. चित्तेसु हे शेतकरी आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी उसाच्या शेतीचे काम केले. यापूर्वी देखील जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती जपानचीच होती. त्या व्यक्तीचा मृत्यू मागच्या वर्षी झाला. त्या व्यक्तीचे नाव मसाजो नोनका होते. त्यांचा मृत्यू 113 व्या वयात झाला.