कर्नाटक निवडणुकीपूर्वी 120 कोटींचा मुद्देमाल जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून प्रत्येक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. कर्यकर्त्यांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडू अनेक अमिषे दाखवण्यात येत आहेत. मतदरांना वेगवेगळ्या प्रकारेच्या भेटवस्तू देण्यात येत आहेत. निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात १२० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सोने, दारु आणि इतर साहित्यांचा समावेश आहे.

निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून ६७ कोटी २७ लाख रुपयांची रोकड, ४३ कोटी १७ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेत. तसेच १८ कोटी ५७ लाख रुपयांचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य ज्त करण्यात आले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. जप्त केलेल्या १५२ कोटी ७८ लाखांच्या रक्कमेपैकी ३२ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम पडताळणीनंतर परत करण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून ते आत्तापर्यंत 39.80 लाख रुपयांचे इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार असून 15 मे रोजी निकाल आहे.