अजब स्वयंवर ! 120 व्होल्टचा झटका सहन करेल तोच खरा मर्द 

लंडन : वृत्तसंस्था – प्रथेच्या नावाखाली कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. आफ्रिकेतील काही जनजातींमध्ये किंवा अनेक अादिवासी जमातींमध्ये खूप विचित्र प्रकारच्या प्रथा किंवा रूढी असल्याचं दिसून येत. अनेक जमातींमध्ये लग्नानंतर खरंच मुलगी कुमारिका होती का हे पाहिले जाते. जर ती कुमारिका नसेल तर तिच्या चारित्र्यावार शिंतोडे उडवले जातात. परंतु ज्या प्रथेबद्दल आपण आता वाचणार आहोत त्यात परीक्षा ही मुलांच्या पौरुषत्वाची घेतली जाते.

यासाठी मुलांना चक्क  120 व्होल्टचा झटका दिला जातो आणि ज्याला हा झटका सहन होईल तोच मर्द असे गृहीत धरले. आपण जरा कुठे विजेचा कमी व्होल्ट असणारा झटका लागला तरी अर्धा जीव सोडून देतो परंतु इथे तर चक्क 120 व्होल्टचा झटका दिला जातो. आपल्याला इतक्या व्होल्टची कल्पनाही करवणार नाही.

युरोपमध्येच असे काही देश आहेत जिथे मुलाचे पौरूषत्व त्यांना सिद्ध करावे लागते. काही देशांमध्ये तरुणांना भयंकर रूढी, परंपरा पाळाव्या लागतात. या देशांमध्ये पुरुषांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी पौरुषत्वाचा पुरावा द्यावा लागतो. अनेक वेगवेगळे स्वयंवर तु्म्ही आतापर्यंत पाहिले असतील किंवा अनेक वेगवेगळ्या स्वयंवराविषयी तुम्ही वाचलेही असेल. परंतु हा पौरुषत्वाचा प्रकार काही अजबच आहे.

युरोपमधील देशांमध्ये पुरुषांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी पौरुषत्वाचा पुरावा द्यावा लागतो. पाश्‍चिमात्य देशांमध्ये अनेक ठिकाणी मुलींच्या लग्नासाठी स्वयंवराचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्वयंवरासाठी येणार्‍या इच्छुक नवरदेवांना पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षाच द्यावी लागते.  स्वयंवरासाठी आलेल्या उमेदवारांना आधी दारू पाजली जाते. यानंतर या उमेदवारांना  120 व्होल्टचा झटका दिला जातो. हा झटक्याला जो उमेदवार सहन करू शकेल त्यालाच ‘खरा मर्द’ मानले जाते आणि त्याच्यासोबत मुलगी विवाह करते.