Coronavirus : मुंबईत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1263 नवे पॉझिटिव्ह तर 44 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1263 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 48 तासात 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले असून मुंबईच्या उपनगरामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपनगरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतली कोरोना बाधितांची एकूण संख्या 92720 इतकी झाली आहे.


मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील सर्वाधिक आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1441 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 64 हजार 872 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के इतके आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 50 दिवसावर पोहचले आहे.

मुंबईत 44 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 285 झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 22 हजार 556 वर पोहचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 50 दिवसावर आला आहे. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 91 हजार 222 चाचण्या झाल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like