12 वी चा निकाल 30 किंवा 31 मे ला ?

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्‍ता 12 वी परिक्षेचा ऑनलाईन निकाल दि. 30 किंवा दि. 31 मे रोजी जाहिर होण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात 14 लाख 45 हजार 132 विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. 9 हजार 486 ज्युनिअर कॉलेज आणि 2 हजार 822 केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी विज्ञान शाखेची परिक्षा 5 लाख 80 हजार 820 जणांनी दिली आहे तर 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थ्यांनी कला शाखेची आणि 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेची परिक्षा दिली होती. 57 हजार 693 विद्यार्थ्यांनी होकेशनलसाठी परिक्षेची नोंदणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासुन समाजमाध्यमांवर इयत्‍ता 12 वी परिक्षेच्या निकालाच्या वेगवेगळया तारखा जाहिर होत होत्या. मात्र, त्या तारखा चुकीच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

आता इयत्‍ता 12 वी परिक्षेचा निकाल दि. 30 किंवा दि. 31 मे रोजी ऑनलाईन जाहिर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. फेबु्रवारी-मार्च 2018 मध्ये इयत्‍ता 12 वी ची परिक्षा झाली होती.