‘शाहू’ कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने मित्राला शेवटचा ‘WhatsApp’ करून युवकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता १२ वी मध्ये हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दत्तवाडी परिसरातील जनता वसाहत येथे घडली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी युवकाने मित्राला शेवटचा व्हॉट्स अ‍ॅप मेसेज केला होता. या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (१८, रा. जनता वसाहत, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश हा कुटूंबासह जनता वसाहतीत रहावयास होता. त्याने ११ वी पर्यंतचे शिक्षण एस.पी. कॉलेजमध्ये पूर्ण केले होते. मात्र, इयत्ता १२ वी साठी त्याला शाहू कॉलेजमधील विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र, तेथे प्रवेश मिळाला नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासुन उदास होता. अखेर बुधवारी रात्री त्यानं मित्राला व्हॉट्स अ‍ॅप मेसेज केला आणि त्यानंतर गळफास घेवुन आत्महत्या केली. कुटूंबातील लोकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. पण उशिर झाला होता. तेथील डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद आहे.

You might also like