विधानसभा 2019 : हडपसरमध्ये 10 इच्छुक उमेदवारांचे 13 अर्ज दाखल, जाणून घ्या उमेदवारांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चेतन तुपे हे शुक्रवारी (दि.4) दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपने योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे. टिळेकर यांनी आज कोंढवा गोकुळ नगर भागातून रॅली काढून हडपर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. तर मनसेचे उमेदवार मोरे यांनी देखील कात्रज येथून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच वंचित विकास आघाडीचे उमेदवार घनश्याम बापू हाके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल उमेदवारांचे अर्ज
योगेश पुंडलिक टिळेकर – भाजप
वसंत कृष्णाजी मोरे – मनसे
घनश्याम आनंद हाके – वंचित बहुजन आघाडी
गंगाधर विठ्ठल बधे – अपक्ष
दीपक महादेव जाधव – बसप
खंडू सतीश लोंढे – अपक्ष
राकेश हारकू वाल्मिकी – अपक्ष
ए सईद अरकाटी – अपक्ष
अ‍ॅड तौसिफ शेख – अपक्ष
कृपाल कृष्णराव कलुसकर – प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष

Visit : Policenama.com