Coronavirus : देशातील ‘या’ 13 शहरांमधील ‘कोरोना’नं वाढवली चिंता, जिथं संक्रमणाचे 70 % रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत चालली आहेत. संसर्गाची प्रकरणे एकुण 1.60 लाखाच्या जवळपास पोहचली आहेत, तर साडेचार हजारपेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गाने देशातील 13 शहरांची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसच्या एकुण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणे केवळ या शहरांतील आहेत, ज्यामध्ये दिल्ली आणि मुंबईचा समावेश आहे.

सरकारी आकड्यांनुसार, देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे रूग्ण वाढून 1,58,333 झाले आहेत, तर 4,531 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. संसर्गाच्या एकुण प्रकरणात 86,110 अ‍ॅक्टिव केस आहेत, ज्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर 67,691 लोक या घातक संसर्गातून बरे झाले आहेत. देशात संसर्ग वाढत असताना 13 शहरांची चिंता वाढत चालली आहे, जेथे कोरोनाच्या कोसेस थांबताना दिसत नाही.

13 शहरात कोरोना संसर्गाची जास्त प्रकरणे
देशाच्या ज्या 13 शहरात कोरोना संसर्गाची सुमारे 70 टक्के प्रकरणे आहेत, यामध्ये दिल्ली, मुंबईसह अहमदाबाद, इंदौर, कोलकाता, हैद्राबाद, जयपुर, जोधपुर, चेन्नई, ठाणे, पुणे, चेंगालपत्तु आणि तिरूवल्लूरचा समावेश आहे. राज्यनिहाय पाहिल्यास या 13 शहरांमधील तीन (मुंबई, पुणे, ठाणे) महाष्ट्रातील आहेत, जेथे कोरोना व्हायरस संसर्गाची सर्वात जास्त 56,948 प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोना संक्रमणाचे सर्वात जास्त रूग्ण जेथे नोंदले गेले, त्यामध्ये तमिळनाडुची तीन शहरे (चेन्नई, चेंगालपत्तु, तिरूवल्लूर ) आहेत.

कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित देशातील 13 शहरात राजस्थानची दोन शहरे (जयपुर, जोधपुर) आहेत. यामध्ये गुजरातचे अहमदाबाद, मध्य प्रदेशचे इंदौर, पश्चिम बंगालचे कोलाकाता आणि तेलंगानाचे हैदराबाद यांचा समावेश आहे. दिल्लीसह या 13 शहरांत कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांनी नगरपालिक आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली, ज्यामध्ये संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like