Coronavirus : ‘या’ 13 जिल्ह्यांनी वाढविली देशातील चिंता, इथं प्रत्येक 7 पैकी एकाचा होतोय मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूपासून 14 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील मृत्यूचे प्रमाण सध्या 2.04 टक्के आहे. देशातील काही भागात हळूहळू परिस्थितीत सुधारत आहे, परंतु 13 जिल्ह्यांनी केंद्र सरकारची चिंता वाढविली आहे. आकडेवारीनुसार 7 पैकी 1 मृत्यू येथे होत आहे. हे 13 जिल्हे देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत.

सर्वाधिक प्रभावित जिल्हे

देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 14% टक्के मृत्यू याच 13 जिल्ह्यांमधील आहेत. हे 13 जिल्हे आहेत- आसाममधील कामरूप मेट्रो, बिहारमधील पटना, झारखंडमधील रांची, केरळमधील अलापुझा आणि तिरुवनंतपुरम, ओडिशामधील गंजम, उत्तर प्रदेशमधील लखनऊ; उत्तर 24 परगणा, हुगळी, हावडा, कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील मालदा आणि दिल्ली.

48 तासांत मृत्यू!

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली या 13 राज्यांतील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल बैठक झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार राज्यांनी रुग्णवाहिकांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी, असे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत या बाबतीत चिंता व्यक्त केली गेली की देशातील 9 टक्के सक्रिय प्रकरणे आणि 14% मृत्यू याच जिल्ह्यांमध्ये होत आहेत. सरकारी अहवालानुसार या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा रूग्णालयात दाखल करण्याच्या 48 तासांच्या आत मृत्यू होत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे की रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करावे.

मृत्यूचे प्रमाण अजूनही अत्यंत कमी

अलिकडच्या काळात भारतात कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. परंतु उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण अजूनही खूपच कमी आहे. भारतात दर 10 लाख लोकसंख्येमध्ये केवळ 30 लोक मरत आहेत. तर जगात प्रत्येक 10 लाखांसाठी हा आकडा 91 आहे. या वेळी ब्रिटनमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे, प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे 684 लोकांचा मृत्यू होत आहे. यानंतर अमेरिकेत हा आकडा 475 आहे.