जुना खोकला नाहीसा करतं ‘डाळींब’ ! मूळव्याधीसह दूर होती ‘या’ शारीरिक तक्रारी, जाणून घ्या 13 आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फळांचे सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून कधीही फायदेशीरच ठरतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फळांचं सेवन करू शकता. आज आपण डाळींबाचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि यामुळं कोणत्या शारीरिक तक्रारी दूर होतात याची माहिती घेणार आहोत.

डाळींब खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) चेहऱ्यावरील तेज वाढतं.

2) अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

4) घसा दुखणं, तोंड येणं हे आजार झाले असतील तर डाळींबाच्या सालीच्या काढ्यानं गुळण्या कराव्यात.

5) यामुळं मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

6) ताप आल्यास डाळींब खावं. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी होते.

7) डाळींबाचे दाणे चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

9) अपचन, पोटात गॅस होणं, शौचास साफ न होणं अशा काही तक्रारी असतील तर त्यावर डाळींब जास्त फायदेशीर ठरतं.

10) जुलाब होत असतील तर डाळींबाच्या सेवनानं ते लगेच थांबतात.

11) हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

12) रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

13) जुनाट खोकला नाहीसा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.