एसटी बस आणि कंटेनर अपघातात चालकासह 15 जणांचा मृत्यु, 20 जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादहून शहादाकडे जात असलेल्या एसटी बसला भीषण अपघात झाला असून त्यात 15 प्रवाशांचा मृत्यु तर 20 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटनेर आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. त्यात एसटी बसची एक बाजू संपूर्णपणे कापली गेली. अपघातातील जखमींना शहादा, दोंडाईचा, धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस शहादाकडे जात होती. त्यावेळी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर बसला कंटेनरने समोरुन धडक दिली. त्यात बसचालक मुकेश पाटील याच्यासह 15 जणांचा जागीच मृत्यु झाला. कंटेनर चालकही जागीच ठार झाला आहे. जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळताच पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. दोन क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. तोपर्यंत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like