8.2 लाख कर्मचार्‍यांनी Lockdown मध्ये काढले PF चे पैसे, तुम्हाला पण काढायचे असतील तर ‘या’ 7 टेप्स करा फॉलो, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील लोकांची परिस्थिती बिकट आहे. पैशाच्या चिंतेमुळे झोप उडाली. लोकांच्या आर्थिक अडचणींचा अंदाज यावरून काढला जाऊ शकतो की, आता पीएफ खात्यातुन पैसे काढून ते खर्च भागवत आहेत. ईपीएफओ आणि खासगी पीएफ फंडातील सुमारे 8.2 लाख सदस्यांनी आपल्या गरजांसाठी 3,243.17 कोटी रुपये काढले आहेत. 28 मार्च रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भागधारक कर्मचार्‍यांना लॉकडाऊनमुळे अडचणींना सामोरे जाण्यासाठी आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली.

12.91 लाख दावे निकाली
कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हंटले कि, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ईपीएफओने एकूण 12.91 लाख दावे निकाली काढले आहेत, ज्यात कोविड-19 संकटात जाहीर झालेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या (पीएमजीकेवाय) पॅकेज अंतर्गत दिलेल्या सूट संबंधित 7.40 लाख दाव्यांचा समावेश आहे. या दाव्यांअंतर्गत एकूण 4,684.52 कोटी रुपये समाविष्ट आहेत, ज्यात पीएमजीकेवाय पॅकेजेस अंतर्गत 2,367.65 कोटी रुपयांच्या दाव्यांचा समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड – 19 साथीच्या रोगामुळे सूट मिळालेल्या खासगी पीएफ ट्रस्टनेही दावे निकाली काढली.

पीएफमधून पैसे काढण्याची ही आहे प्रक्रिया
1: https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या दुव्याद्वारे आपल्या यूएएन खात्यावर जा.

2: ऑनलाइन सेवांवर जा आणि क्लेम फॉर्मवर क्लिक करा.

3: आपल्याला एक पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल ज्यात आपले सर्व तपशील असतील. (आपल्या खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करुन हे आपले बँक खाते सत्यापित करण्यास सांगेल.)

4: तपशील भरून पुढे जा.

5: पीएफ अ‍ॅडव्हान्स फॉर्म 31 वर क्लिक करा.

6: यानंतर आपल्याला आपल्या बँक चेकची किंवा पासबुकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करण्यास सांगितले जाईल.

7: त्यानंतर आपल्याला आधार क्रमांकाद्वारे ओटीपी मिळेल. फक्त हा ओटीपी भरा. यानंतर जास्तीत जास्त 15 दिवसात पैसे तुमच्या खात्यात येतील.