गडचिरोलीत ठार झालेल्या १३ नक्षलवाद्यांवर होते ६० लाखांचे बक्षीस

0
195
13 naxalites killed in gadchiroli get rs 60 lakh reward commander deputy commander are among those killed
File photo

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात एटापल्ली तालुक्याअंतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल शिवारात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाले. या सर्वांवर शासनाने ६० लाख रुपयांचे बक्षीस ठेले होते. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी चकमक ठरली आहे. या १३ नक्षलवाद्यांमध्ये ६ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे.

तेंदुपत्ता हंगमाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसुल करण्याच्या उद्देशाने पैडी जंगलात नक्षलवादी एकत्र आले होते. त्यांची कुणकुण पोलिसांच्या सी ६० पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, एएसपी समीर शेख, सोमय मुंडे, भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सी ६० पथकाने शोध मोहिम सुरु केली. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जंगलात दबा धरुन बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला जोरदार प्रतिउत्तर दिले. दीड तास सुरु असलेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले. याशिवाय ४ ते ५ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

नक्षलवाद्यांकडून एके ४७ रायफल, ५ एसएलआर, स्टेनगन, ३ नग ३०३ रायफल, २ नग ८ एमएम रायफल, एक पिस्टल आणि बºयाच मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहे. चकमकीत मृत्यु पावलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आज दुपारी गडचिरोलीत आणण्यात आले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या माध्यमातून या सर्वांची ओळख पटविण्यात आली. सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा (डीव्हीसीएम), नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी (एसीएम), किशोर उर्र्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे (पीएम), रुपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे (उपकमांडर), सेवंती हेडो (पीएम), किशोर होळी (जनमिलिशिया), क्रांती उर्फ मैना उर्फ रिना माहो मट्टामी (पीएम), गुनी उर्फ बुकली धानू हिचामी (पीपीसीएम), रजनी ओडी (पीएम), उमेश परसा (एसीएम), सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालू नरोटी (पीएम), सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम (सदस्य), रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नू कारामी (पीएम) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.