Annexe हॉस्पीटलच्या लिफ्टमध्ये 13 जण अडकले, अग्नीशमननं केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात नामांकित अशा Annexe हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये सकाळी 7 पासून तबल 13 लोक अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक प्रयत्ननंतर त्यांची पावणे अकरा वाजता सुटका करण्यात आली आहे.

हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलजवळ 5 मजली Annexe हॉस्पिटल आहे. सकाळी सात वाजता काही रूग्णांना त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी तसेच काही जण घरी जाण्यासाठी निघाले होते. यात काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान 4 आणि 3 तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टने लोक खाली येत होते. त्याचवेळी अचानक लिफ्ट बंद पडली.

तात्काळ हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यांनी काही वेळ प्रयत्न केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. साडे नऊ वाजता अग्निशमनच्या 3 फायर गाड्या जवानांसह येथे दाखल झाल्या. त्यांनी प्रयत्न करून पावणे आकरा वाजता सर्वांची सुखरूप सुटका केली. दरम्यान, रूग्णालाच्या लिफ्टमध्ये 13 लोक अडकल्याची माहिती मिळालल्या नंतर मोठी खळबळ उडाली होती. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा