13 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंतीवरून बदल्या

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तब्बल 13 वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (सोमवारी) प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

1. शंकर श्रीरंग बाबर (विनंतीवरून – व.पो.नि. पिंपरी ते गुन्हे शाखा, युनिट-3, अतिरिक्त कार्यभार एम.ओ.बी.)
2. राजकुमार शिंदे (विनंतीवरून – व.पो.नि. चिखली ते वाहतुक शाखा)
3. मिलींद वाघमारे (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. नियंत्रण कक्ष ते व.पो.नि. पिंपरी)
4. सतिश दत्तात्रय माने (प्रशासकीय कारणास्तव – व.पो.नि. वाकड ते व.पो.नि. चिखली)
5. विवेक वसंतराव मुगळीकर (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. गुन्हे शाखा, युनिट-3 ते व.पो.नि. वाकड)
6. राजेंद्र हिंदूराव राजमाने (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. गुन्हे वाकड ते प्रभारी रावेत चौकी)
7. गणेश साहेबराव जवादवाड (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. गुन्हे चिखली ते व.पो.नि. निगडी)
8. राजेंद्र जयवंत निकाळजे (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. गुन्हे, निगडी ते पो.नि. गुन्हे, पिंपरी)
9. शहाजी नारायण पवार (प्रशासकीय कारणास्तव – संगणक विभाग ते पो.नि. गुन्हे, तळेगांव दाभाडे)
10. अरूण रघुनाथ ओंबासे (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. वाहतुक, भोसरी ते पो.नि. वाहतुक, निगडी)
11. शिवाजी पी. गवारे (प्रशासकीय कारणास्तव – पो.नि. वाहतुक, आळंदी ते पो.नि. वाहतुक, भोसरी)
12. देवराम चव्हाण (वैद्यकीय कारणास्तव – पो.नि. गुन्हे ते पो.नि. नियंत्रण कक्ष)
13. सुनिल जनार्दन टोणपे (पदनामात बदल करून प्रशासकीय कारणास्तव – व.पो.नि. निगडी ते पो.नि. गुन्हे, निगडी)