धक्कादायक ! पुण्यात कार्टुन पाहू न दिल्यानं 13 वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या

पुणे : कार्टुन पाहू न दिल्याच्या रागातून १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बिबवेवाडी येथे उघडकीस आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १३ वर्षाच्या मुलाने नुकताच ७ व्या वर्गात प्रवेश केला होता. मंगळवारी सकाळपासून तो कार्टुन पहात बसला होता. त्यामुळे त्याच्या घराच्यांनी त्याला अनेक वेळा कार्टुन पाहून नको, असे सांगितले़ तरी त्याने कोणाचे ऐकले नाही. शेवटी टिव्ही बंद करुन घरातले सर्व जण बाहेर गेले.

टी व्ही बंद केल्याने रागात हा मुलगा  वरच्या खोलीत गेला. तेथे त्याने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील लोक सायंकाळी परतल्यानंतर त्यांनी हा मुलगा बराच वेळ खाली आला नाही, म्हणून त्याला पाहण्यासाठी गेले असताना त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.