अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ‘बलात्कार’, तब्बल २३ दिवसांनी ‘सुटका’

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. त्या घटनांना दुजोरा देणारी अजून एक घटना जालना शहरात घडली. जालना शहरात एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीचे जालना शहरातून अपहरण करून तिला हिंगोली जिल्ह्यात सेनगाव येथे एका घरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी तिची सुटका केली असून या नराधमांनी तब्बल २३ दिवस तिला डांबून ठेवले होते. या दरम्यान तिच्यावर अपहरनकर्त्यांनी अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेचा पुढील तपास चालू आहे.

चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथून काही अज्ञात लोकांनी मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने चंदनझिरा पोलिसांत दाखल केली आहे. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, पोलीस पथकांनी तब्बल ८ दिवस अथक परिश्रम घेऊन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथून मुलीची सुटका केली आहे. पीडित मुलीला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन महिलांचा समावेश असून इतर तिघे असे पाच जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून अपहरण करण्यामागील नेमका हेतू काय होता याचादेखील तपास चालू आहे.

याबद्दल अधिक माहिती म्हणजे जालन्यामधून १३ नोव्हेंबरला एका तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मात्र अनेक दिवस उलटून गेले तरीही मुलीचा शोध काही लागत नव्हता. अखेर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास कार्यास सुरुवात केली, त्यानंतर हे उघडकीस आले की या मुलीचे अपहरण तिच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील नातेवाईक असलेल्या एका आरोपीने केले आहे. ही माहिती ऐका खबऱ्याकडून पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुलीबद्दल माहिती विचारली असता मुलीचे अपहरण केल्याचे त्यांनी कबुल केले आणि मुलीला हिंगोली जिल्ह्यात एका शेत वस्तीत ठेवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मुलीची सुटका करण्यात आली.

यानंतर तपासादरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पुढील तपास करत असून मुलीची विक्री करण्याचा आरोपींचा डाव होता का? यायाबाबत देखील तपासकार्य सुरु असून पोलिसांनी आरोपींवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com

You might also like