मित्राच्या 13 वर्षाच्या बहिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. मुलीला तिच्या भावाच्या मित्राने कॉफी शॉपवर बोलावले होते. तेथून त्याने मुलीला आपल्या फ्लॅटवर नेले. येथे मुलीला दारू पाजली गेेेली आणि नंतर मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. कसं तरी मुलगी तिच्या घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वैद्यकीय तपासणी करून दोन आरोपींना अटक केली आहे.

काझीखेडा येथील रहिवासी असलेल्या 13 वर्षीय दलित मुलीला माहित नव्हते तिच्या भावाचा मित्र तिच्यासोबत असा खेळ खेळेल. मुलीने सांगितले की, शनिवारी भावाचा मित्र साहिलने तिला कॉल केला आणि कॉफी शॉपवर बोलावले. येथून साहिल मुलीला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्याने मुलीला मद्यप्राशन करायला भाग पाडले. मद्यपान केल्यासने मुलीलाा शूूूद्ध नव्हती. यावेळी आरोपी युवकाने आपल्या मित्रांसह सामूहिक बलात्कार केला.

दुसरीकडे, मुलगी अचानक घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी चिंता करायला सुरुवात केली. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय एकत्र आले, पण मुलगी कोठेही सापडली नाही. हरवलेल्या मुलीची माहिती कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात दिली. रविवारी मुलगी वाईट अवस्थेत तिच्या घरी पोहोचली. आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली. तिने सांगितले की भाऊचा मित्र साहिल याने त्याचे तीन मित्र राहुल सोनकर, व्ही के राजपूत आणि मिथुन यांच्यासह सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपी तिला खोलीत सोडून पळून गेले.

पीडित मुलीचे म्हणणे ऐकल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले आणि या प्रकरणाची माहिती दिली. मुलीने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला, ज्यामध्ये राहुल आणि मिथुन यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती एसपी सिटी राजकुमार अग्रवाल यांनी दिली. पोलिस आरोपींवर पोक्सो कायद्यात कारवाई करीत आहेत.

You might also like