3 वेळा IS च्या आतंकवाद्यांना विकली गेली 13 वर्षीय मुलगी, तिच्यावर दररोज लैंगिक अत्याचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवादी संघटना आयएसच्या ताब्यातून सुटलेल्या एका पीडित महिलेने आपली कहाणी सर्वांना सांगितल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटा आला. केवळ 13 व्या वर्षी दहशतवाद्यांनी तिचे अपहरण करून तिच्यावर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार केले. यामुळे आयुष्यभर न विसरणाऱ्या जखमा तिच्या मनावर झाल्या आहेत.

या दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेल्या यहुदींच्या शिबिराचे निर्देशक हुसैन अल कादी यांनी मुंबईत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत या महिलेने आपली हृदयद्रावक कहाणी सर्वांना सांगितली. यावेळी त्या महिलेने सांगितले कि, तिला तीन वेळा विकण्यात आले. यावेळी तिच्यावर दररोज लैंगिक अत्याचार केले जात असतं. त्याचबरोबर याठिकाणी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे देखील तिने यावेळी आवाहन केले. त्याचबरोबर सिंजरमधून अमेरिकेच्या सैन्याने घेतलेल्या माघारीला चूक म्हटले असून यामुळे कट्टरपंथीय आणि आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना आणखी जोर मिळणार असल्याचे देखील तिने म्हटले आहे. तर अल कादी यांनी सांगितले कि, 2014 मध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी सिंजरवर कब्जा केला होता. त्यामुळे तेथील हजारो यहुदी नागरिकांना पलायन करावे लागले होते. तर शेकडो नागरिकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते तसेच जिवंत जाळून ठार करण्यात आले होते.

दरम्यान, कब्जा केल्यानंतर युवकांना दहशतवादी बनवण्यात आले आणि महिलांबरोबर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्याचबरोबर अनेक महिलांना दहशतवाद्यांबरोबर लग्न करण्यासाठी देखील मजबूर करण्यात आले.

Visit : Policenama.com