चीन : ‘कोरोना’ व्हायरसनं 132 जणांचा जीव घेतला, 6000 जणांना लागण, आगामी 10 दिवसात ‘धोका’ वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. यामध्ये 25 अजून लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच यामध्ये मृत्युमुखी पडलेल्याचा आकडा 132 वर पोहचला आहे. तर सहा हजरांपेक्षा अधिक लोकांना याचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळते. येत्या दहा दिवसांमध्ये याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, व्हायरसच्या संसर्गाच्या 5974 प्रकरणांची पुष्टी झाली आहे आणि न्यूमोनियाची 31 नवीन प्रकरणे मंगळवारपर्यंत नोंदली गेली आहेत. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार व्हायरसमुळे आतापर्यंत एकूण 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवार पर्यंत हुबेई प्रांतात कोरोना विषाणूमुळे 125 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3554 रुग्णांना प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.

व्हायरसने ग्रासलेल्या पीडितांमधील 1239 जणांची हालत गंभीर आहे. हा व्हायरसमध्ये अनेक विषाणू आहेत मात्र त्यापैकी केवळ सहाच विषाणू मनुष्यासाठी हानिकारक आहेत. 2002 – 03 साली चीन आणि हॉंगकॉंगमध्ये याच व्हायरसमुळे 650 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

फेसबुक पेज लाईक करा