Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 134 नवे रूग्ण, महाराष्ट्रातील संख्या 1895 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाचे तब्बल 134 नवीन रूग्ण आढळून आले असून आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 113 रूग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबई सर्वाधिक हॉटस्पॉट बनली आहे.

नवीन आढळलेल्या रूग्णांपैकी 113 मुंबईत, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळून आला आहे. पुणे शहरात 4 आणि मिरा भाईंदरमध्ये 7 रूग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि वाशी-विरारमध्ये प्रत्येकी 2 रूग्ण आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर जाऊन पोहचली असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे.