Solapur News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई ! पंढरपूर तालुक्यातून 134 जण हद्दपार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  तालुक्यात होणाऱ्या ७१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका लोकशाही मार्गाने व शांततेत पार पडण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १३४ जणांना १४ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केली.

>> पंढरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत कलम १०७ नुसार ८० जणांवर, कलम ११० नुसार ३४ जणांवर, कलम ११४(२) नुसार ६३ जणांवर, कलम १४९ नुसार ४२९ जणांवर तसेच महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १७ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

>> पंढरपूर शहर पोलिस ठाणे अंतर्गत कलम १०७ नुसार ५८ जणांकडून चांगल्या तुमचे वर्तणुकीचे बाँड घेण्यात आले आहेत. तर कलम ११० नुसार ३ जणांवर व
महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे ३३ प्रतिबंधक जणांवर कारवाई केली.

>> पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत कलम १०७ नुसार २५ जणांवर, कलम ११० नुसार १३ जणांवर, कलम १४४(२) नुसार ३२ जणांवर, कलम १४९ नुसार ३६६ जणांवर तसेच महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १५ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

>> करकंब पोलीस ठाणे अंतर्गत कलम १०७ नुसार ५८ जणांवर, कलम ११० नुसार ७ जणांवर, कलम १४४(२) नुसार ४० जणांवर, कलम १४९ नुसार १२८ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली गेली.

पंढरपूर उपविभागात एवढी कारवाई

आगामी निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी पंढरपूर पोलीस उपविभागात कलम १०७ नुसार ३२८ जणांवर, कलम ११० नुसार १६७ जणांवर, कलम १४४(२) नुसार १३४ जणांवर, कलम १४९ नुसार १०७२ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम प्रमाणे ६५ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.