मुंबईत वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 137 लोकांचा मृत्यू, 579 जखमी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन नागरिकांचा बळी जात असतो. यामध्ये विविध प्रकारच्या घटनांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विविध घटनांचा समावेश असून घर पडणे ,शॉक लागणे, तसेच नाल्यात किंवा समुद्रात वाहून जाणे तसेच बुडणे तसेच इमारत कोसळून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश आहे.

यामध्ये सर्वाधिक मृत्यू होत असून यावर्षी  झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये वर्षभरात 137 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 579 जण जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन  विभागाकडे मागितलेल्या माहितीतून  समोर आले आहे. यावर्षी विविध प्रकारच्या 9943 घटना घडल्या असून यामध्ये137 जणांचा मृत्यू झाला आहे.

सहा वर्षात 978 मृत्यू

2013 ते 2018 या कालखंडात 49 हजार 179 दुर्घटना घडल्या असून यामध्ये 978 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या घटनांचा समावेश असून महापालिकेने याविषयी विस्तृत आकडेवारी दिली आहे. यामध्ये झाडं पडून तसेच फांद्या पडून पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 लोकं जखमी झाले आहेत. तर घर कोसळून 51 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर आग आणि इतर दुर्घटनेत 17 लोकांचा मृत्यू  झाला आहे. त्याचबरोबर समुद्र, नाल्यात आणि  खड्यात पडून झालेल्या दुर्घटनेत  39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत. तसेच विषबाधेतून 34 जण जखमी झाले आहेत. मात्र या सगळ्यात इमारत कोसळून कोसळून सर्वात जास्त मृत्यू झाल्याने महापालिकेला याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.