Coronavirus Lockdown : राज्यात 14 जिल्हे ‘रेड’ तर 16 ‘ऑरेंज’ आणि 6 ‘ग्रीन’ झोनमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंद्र सरकारने राज्यातील जिल्हे तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन या तीन विभागात विभागले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये दाखवले आहेत तर 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये दाखवण्यात आले आहेत. तर उर्वरित 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबत एक आलेखच केंद्राने प्रत्येक राज्याला पाठवला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन तीन मे रोजी संपत असून तत्पूर्वी केंद्र सरकारने कोणत्या जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून शिथिलता देता येईल हे प्रत्येक राज्याला कळवले आहे.

केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक राज्याने त्यानुसार रेड आणि ऑरेंज झोनच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या हद्दी निश्चित करून केंद्र शासनाला सुचित करावे. कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही जोपर्यंत त्या जिल्ह्यात सलग 21 दिवस नव्याने कोरोनाची एकही केस नसेल.

शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये देशभरातील 130 जिल्हे रेड झोन, 284 जिल्हे ऑरेंज झोन तर 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व अन्य क्षेत्रांना वेगवेगळे वर्गीकरण करता येऊ शकेल. रेड किंवा ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या ठिकाणी 21 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसेल अशा ठिकाणी झोनचा दर्जा कमी करता येईल.

आज जाहीर झालेल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तर 16 जिल्हे ऑरेंज झोन आणि 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहेत. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रातील लॉकडाऊन संदर्भात नियमावली येत्या 3 मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.

राज्यातील रेड झोनमधील जिल्हे
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव

राज्यातील ऑरेंज झोनमधील जिल्हे
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड

राज्यातील ग्रीन झोनमधील जिल्हे
उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा