नाशिक : १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू, आईच्या भूमिकेवर संशय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमध्ये १४ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूने आज खळबळ उडाली, परंतू हा मृत्यू नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्वरा मुकेश पवार या मुलीचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद महामार्गवरील पॅराडाईज नावाच्या अपार्टमेंटमधील मुकेश पवार यांच्या कुटूंबामध्ये ही दुर्देवी घटना घडली. कुटूंबियांनी मुलीला जखमी अवस्थेत पंचवटी निमाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
घरात मुलगी आणि मुलीची आई होती, वडील कामावर गेले होते. घरातील मुलीची आई देखील जखमी आहे. पोलिसांनी चौकशी केली असता आई वेगवेगळी माहिती देत आहे म्हणून आईवरील संशय बळावल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आईच्या हातावर देखील जखमेच्या खूणा आहेत. परंतू नेमके काय झाले यांचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीसांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, पॅराडाईज सोसायटीमधील एका घरात पवार कुटूंब राहतात. स्वरा पवार फक्त १४ महिन्याची आहे. जखमी अवस्थेत कुटूंबियांनी तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतू तिला डॉक्टराकडून मृत घोषित करण्यात आले.

मुलीच्या आई वडिलांनी याबाबत अजून पोलिसांना माहिती दिली नाही. मुलीच्या गळ्यावर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतू यामुळे अजूनच गोंधळ वाढला आहे. पोलीस सर्व काही तपासात आहेत. नेमके काय झाले याची देखील सध्या परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like