छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

सुकमा : पोलीसनामा आॅनलाईन

छत्तीसगडधील सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. नक्षलविरोधी कारवाईत भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश मिळाले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत केली आहेत.

[amazon_link asins=’B07CNW7ZSH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0eb3d8d-994b-11e8-8d1f-417e2e373a2f’]

सुकमामधील कोण्टा आणि गोपाल्ली परिसरात सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियानांतर्गत आज (सोमवारी) कारवाई केली आहे. यावेळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 14 नक्षली ठार झाले आहेत.