भयानक ! शिक्षा म्हणून १४ विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल १६८ वेळा विद्यार्थीनीच्या कानफटात लगावल्या

झाबुआ (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – शाळेतील मुलांना वळण लागण्यासाठी शिक्षक शिक्षा करतात. त्या सौम्यही असतात आणि कडकही. शिक्षक हा मार्गदाता असतो. मात्र विद्यार्थीनीला झाबुआ येथील एका निर्दयी शिक्षकाने अनोखी शिक्षा दिली आहे. मात्र पालकांना या विद्यार्थीनीने सांगितल्यावर सर्व प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षकाला अटक केली आहे.
काय दिली होती शिक्षा विद्यार्थीनीने गृहपाठ न केल्याने चिडलेल्या शिक्षकाने तिला दररोज कानाखाली मारण्याची शिक्षा दिली. वर्गातील १४ विद्यार्थींना या मुलीच्या कानाखाली मारण्याची शिक्षा या शिक्षकाने दिली. अशा प्रकारे तिला १६८ वेळा कानाखाली मारण्यात आल्या.

दिवसातून दोन वेळा शिक्षा
जानेवारीमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. शिक्षक मनोज कुमार वर्मा याने वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी गृहपाठ विषयी विचारले. मुलीला विचारल्यानंतर तिने गृहपाठ केला नसल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या वर्माने या मुलीला दिवसातून दोन वेळा कानाखाली मारण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा करण्यासाठी वर्माने वर्गातीलच १४ मुलांची निवड केली होती.

शिक्षक गजाआड

शाळेत घडलेला प्रकाराची माहिती मुलीने आपल्या पालकांना दिली. पालकांनी याचे गांभिर्य ओळखून पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलीस देखील ही अनोख्या शिक्षा ऐकून चकीत झाले. त्यांनी तात्काळ शिक्षक मनोज कुमार वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच वर्माने गावातून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोमवारी मुसक्या आवळल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like