गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी 14 गावकर्‍यांना अटक

पोलिसनामा ऑनलाईन – श्रीराम टेकडी येथील गणेश महाराजांवर (Ganesh Maharaj)
अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी १४ जणांना अटक केली. महाराज आणि निलजगावातील गावकऱ्यांनी रविवारी बिडकीन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधी तक्रारी दिल्या. तक्रारीनुसार निलजगावच्या अज्ञात २५ जणांसह गणेश महाराजांविरोधात(Ganesh Maharaj) बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गणेश महाराजांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी त्यांची गाय परिसरातील मका पिकात गेली असता मी गाईला मूर्ख, असे संबोधले; परंतु तेथे हजर असलेल्या वारकऱ्यांनी ते स्वतःवर घेत २५ ते ३० जणांनी मला मूर्ख कुणाला म्हणता, असे विचारलं. आणि दगड, काठ्या व कुऱ्हाडीने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. मला टेकडीवरून ढकलून दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. शुक्रवारी मोक्षदा एकादशीला मेहरबान नाईक तांडा (ता. पैठण) भागातील श्रीराम टेकडीवर गणेश महाराज आणि निलजगाव येथील गावकऱ्यांत बाचाबाची झाली. आणि वाद एवढे विकोपाला गेले की त्याचे रूपांतर हल्ल्यात झाले.

दरम्यान, औरंगाबाद येथे गणेश महाराजांवर उपचार सुरू आहेत, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गणेश महाराजांनी वादादरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितलं.