‘न्यूड’ फोटो पाठवून ‘सेक्स चॅट’साठी दबाव टाकायचा मुलगा, वय वाचल्यानंतर बसेल ‘धक्का’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बीए करणाऱ्या एका मुलीला एक मुलगा तिची मॉर्फ्ड केलेली इमेज पाठवून ब्लॅकमेल करत सेक्स चॅटसाठी दबाव टाकत होता. धक्कादायक बाब अशी आहे की, हा मुलगा सहवीत शिकणारा होता. हे वाचून तुम्हीही अवाक् झाला असाल.

काय आहे प्रकरण ?
एका इंग्रजी वृत्तानुसार, हे प्रकरण गाझियाबादमधील आहे. बीएची एक मुलगी होती जी युपीएससीची देखील तयारी करत होती. लॉकडाऊनमध्ये चांगला अभ्यास करता यावा यासाठी ती टेलिग्रामवरून एका ग्रुपला जॉईन झाली. 7 मे रोजी तिला एक पर्सनल मेसेज आला. या अभ्यासाचं काही नसल्यानं तिनं यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याच नंबरवरून तिला तिचा मॉर्फ केलेला एक अश्लील फोटो फोटो आला आणि तिच्यावर सेक्स चॅटसाठी दबाव टाकण्यात आला. तिनं नकार दिल्यानंतर तिचा फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेली.

कुटुंबानं खूपदा विचारल्यानंतर मुलीनं सर्व प्रकार सांगितला. यानंतर गाझियाबादच्या एका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तपासात समोर आलं की, आरोपी 14 वर्षांचा आहे. एका रिपोर्टनुसार, तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सदर आरोपी मुलानं आणि त्याच्या पालकांनी सर्व आरोपांचं खंडन केलं. मुलाचं म्हणणं हे की, हे अकाऊंट भलेही त्याचं आहे परंतु त्याला नाही माहिती की, हे मेसेज कसे गेले. कोणीतरी अकाऊंट हॅक करून हे काम केलं असं तो म्हणतो आहे. पोलीस IP अ‍ॅड्रेस शोधत आहेत. त्यांनी टेलीग्रामकडूनही माहिती घेतली आहे. मुलीनं या घटनेशी संबंधित 18 स्क्रीनशॉट्स, जमा केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like