धक्कादायक ! ‘गंमत’ म्हणून परदेशातून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यानं मुख्याध्यापक, शिक्षिका आणि मुलींना पाठवले ‘पॉर्न’ व्हिडीओ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलचे वेड सर्वांनाच लागले आहे. यामध्ये जास्त करून विद्यार्थ्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. पालक आपल्या मुलांना चांगल्या हेतूने मोबाईल देतात मात्र, हिच मुलं त्याचा दुरुपयोग करताना दिसून येतात. यामुळे विद्यार्थी बिघडू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुण्यातील एका नामवंत शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गंमत म्हणून पॉर्न क्लिप आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षिका आणि विद्यार्थिनींना पाठवल्या आहेत. विशेष म्हणजे या मुलाने आपल्या फेक ईमेल आयडीवरून या क्लिप पाठवल्या आहेत. शाळेतील मुलाकडून अशा प्रकारचे कृत्या उघडकीस आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल द्यायचा की नाही हा विचार करण्याची वेळ पालकांवर आली आहे.

लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे जिवंत उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पुणे ग्रामीण मधील पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट ते 23 डिसेंबर 2019 या दरम्यान घडली आहे. याकाळात मुख्याध्यापकांसह शिक्षिका आणि 65 विद्यार्थीनींना सतत पॉर्न व्हिडीओ पाठवण्यात आले. हळू हळू सर्वांनाच याची कुणकुण लागली की हे अनेकांसोबत होत आहे. जेव्हा हे प्रकरण शाळा प्रशासनाकडे गेले त्यावेळी याची चौकशी सुरु झाली. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये ज्या मेल आयडीवरून हे व्हिडीओ क्लिप वाठविल्या जात आहेत त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधण्यात आला.

त्यावेळी परदेशातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याचा शोध लागला. तपासादरम्यान हा विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने याची कबुली दिली आहे. त्याने हे सर्व गंमत म्हणून केल्याचे सांगितले. त्याला हे करणे गुन्हा असल्याचे माहित नव्हते. तो त्याच्या वर्गमित्र आणि शिक्षकांना त्रास देणार होता. विद्यार्थ्याच्या या कबुलीमुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. नंतर तो त्याच्या देशात निघून गेला होता. मात्र शाळा प्रसासनाने या विद्यार्थ्याविरोधात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे प्रकरण सायबर क्राईमकडे वर्ग करण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, शाळेने कारवाई करण्यापूर्वीच या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यानंतर आमच्याकडे खूप उशिराने शाळेने संपर्क साधला. याप्रकरणात एका शिक्षिकेने तक्रार दिला असून या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांनाही व्हिडिओ क्लीपचे मेल केले होते. त्यामुळे आरोपी विद्यार्थ्याच्या विरोधात पॉस्को कायद्यासह आयटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संबंधित आरोपीला बाल कल्याण समितीसमोर आणले जाणार आहे.