नराधमाने घरात घुसून केला १४ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार

भिवंडी : पोलीसनामा

राज्यात मुलींची छेडछाड व अत्याचारांचे प्रकार लागोपाठ घडत असून या संतापजनक घटना थांबताना दिसत नाहीत. आता भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात असाच भयंकर प्रकार घडला आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर घरात घुसून नराधमाने बलात्कार केला. नंतर तिची पाण्याच्या टबमध्ये बुडवून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात नराधमाविरूद्ध हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B00000IZQP,B00S9TB9Y0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cdc598f-a75d-11e8-b289-7faca20cbe6f’]

पीडित मुलगी आई-वडील आणि मोठ्या बहिण-भावासह मानकोली येथे राहात होती. तिचे आई-वडील कामावर गेल्याचे पाहून नराधमाने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. नंतर मुलीची टबमध्ये बुडवून हत्याही करून नराधम आरोपी पसार झाला.

पीडितेचा लहान भाऊ घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर नारपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पीडितेचा मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला होता. फरार नराधम आरोपीचा शोध पोलीस घेत असून या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुलींची छेडछाड व बलात्काराचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Loading...
You might also like