देशभरात ३ महिन्यात पावसाचे १४०० पेक्षा जास्त बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १४ लाखांपेक्षा जास्त लोकांना बेघर व्हावे लागले. या पुरग्रस्तांची व्यवस्था सध्या मदत शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात २५४, पश्चिम बंगालमध्ये २१०, कर्नाटकात १७०, महाराष्ट्रात १३९, गुजरातमध्ये ५२, आसाममध्ये ५०, उत्तराखंडमध्ये ३७, ओदिशामध्ये २९ तर नागालँडमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. मागील तीन महिन्यात देशभरात पावसाने १४०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहखात्याने दिली आहे.

[amazon_link asins=’B00LHZW3XY,B00LHZW91A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8efb4ea7-aff6-11e8-a69e-219ef4ff639e’]

केंद्रीय गृहमंत्रालयान जाहीर केलेल्या माहितीत म्हटले आहे की, मागील तीन महिन्यात पाऊस, पूर आणि भूस्खलन या कारणांमुळे १० राज्यात १४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळच्या पुरात प्राण गमावलेल्या ४८८ लोकांचाही समावेश आहे. केरळमध्ये ४८८ लोक पूर, पाऊस आणि भूस्खलनामुळे मरण पावले. तर १४ जिल्ह्यातील ५४ लाख ११ हजार लोकांना या पुराचा फटका बसला. पाऊस आणि पुराचे थैमान यामुळे केरळमधून १५, उत्तर प्रदेशातून १४, पश्चिम बंगालमधून ५, उत्तराखंडमधून ६ आणि कर्नाटकातून ३ लोक बेपत्ता झाले. तर याच कारणामुळे १० राज्यांमध्ये सुमारे ३८६ लोक जखमी झाले. आसाममध्ये ११ लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला. तर पश्चिम बंगालमध्ये २ लाख २८ हजार लोकांना पुराचा तडाखा बसला. कर्नाटकात ३ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना पुरामुळे त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्रात २६ जिल्हे, ओदिशातले ३० जिल्हे, आसाममधळे २५ जिल्हे, पश्चिम बंगालचे २३ जिल्हे, केरळमधले १४ जिल्हे पूरग्रस्त झाले आहेत.

५०० कोटी हे तर केरळसाठी अ‍ॅडव्हान्स : केंद्र