पुण्यात कोयते विक्रेत्यांवर धाड, तब्बल 142 धारदार शस्त्र जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात खुन, खुनाचा प्रयत्न तसेच हाणामारीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने लांबलचक कोयत्याचा वापर केल्याचे दिसून येत आहे. मटण कापण्यासाठी वापरण्यात येणारे हे कोयते बाजारात सर्रासपणे विकत मिळत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या कोयत्यांच्या विक्रेत्यांनाच लक्ष्य केले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ठिकाणी छापे घालून तब्बल १४२ कोयते जप्त केले आहे.

गणेश पेठेतील गणेश बकेट स्टोअर्स या दुकानात कोयते विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकाने छापा घातला. तेथे १३१ कोयते आढळून आले. तेथून घाऊक प्रमाणात कोयत्यांची विक्री केली जात होती. दुकानाचे चालक महावीर बिरजलाल
गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत मंगळवार पेठेतील जुना बाजारातील महाराणा प्रताप स्टील या दुकानात कोयते असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दुकानावर छापा घालून तेथून ११ कोयते जप्त केले आहे. जयसिंग पवार यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit – policenama.com