Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 3827 नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 142 जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात आज 3827 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 142 रुग्णांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासामध्ये 1935 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 331 इतकी झाली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मागील काही दिवसांपासून राज्यात तीन हजारापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत.

राज्यात सध्याच्या घडीला 55 हजार 651 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तर 62 हजार 773 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील चोवीस तासांतील आकडेवारीनंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्य एक लाख 24 हजाराच्या वर गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.49 टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 4.74 टक्के इतका झाला आहे असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात मागील 24 तासात 142 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 1269 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 1269 रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 हजार 068 इतकी झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.