‘ऑक्टोबर’ सिनेमा आहे ‘या’ मराठी चित्रपटाची कॉपी ?

मुंबई : वृत्तसंस्था

सुजित सरकारचा ‘ऑक्टोबर’ हा चित्रपट मराठीतील ‘आरती-द अननोन लव्ह स्टोरी’ या सिनेमाची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. हेमल त्रिवेदी नावाच्या एका निर्माता-एडिटरने फेसबुकवर सुजित सरकारवर चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे.

हेमल त्रिवेदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सुजित सरकारने सारिका मेने यांचा मराठी चित्रपट ‘आरती- द अननोन लव्ह स्टोरी’ चोरला आहे. सारिका मेने यांचा भाऊ सनी याच्या खऱ्या आयुष्यावर ‘आरती’ सिनेमा बेतला आहे. सुजित सरकारने चित्रपटाची कथा, पटकथाच नाही तर ओरिजनल फिल्मधील सीन्स आणि लूकही हूबेहूब कॉपी केले असल्याचा आरोप केला आहे.

हेमल त्रिवेदी नावाच्या एका निर्माता-एडिटरने फेसबुकवर शूजित सरकारवर चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे.

हेमल त्रिवेदी यांची पोस्ट

“सुजित सरकारने सारिका मेने यांचा मराठी चित्रपट ‘आरती- द अननोन लव्ह स्टोरी’ चोरला आहे. सारिका मेने यांचा भाऊ सनी याच्या खऱ्या आयुष्यावर ‘आरती’ सिनेमा बेतला आहे. शूजित सरकारने चित्रपटाची कथा, पटकथाच नाही तर ओरिजनल फिल्मधील सीन्स आणि लूकही हूबेहूब कॉपी केले आहेत.

ऑक्टोबरच्या दिग्दर्शकांनी मराठी फिल्मचे राईट्स कधीच मागितले नाहीत. शिवाय आरतीच्या निर्मात्या सारिका मेने यांच्याशीही कधी संपर्क साधला नाही. शूजित सरकारच्या या कृत्यामुळे सारिका एवढी खचली आहे की, ती सुसायडल केस झाली आहे. मागील काही दिवसात ती देशातील अनेक संस्थांमध्ये गेली, पण कोणीही तिची मदत केली नाही. न्याय मिळवण्यासाठी तिने दोन लाख रुपयेही खर्च केले आहेत.

सारिका एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आरती चित्रपट बनवण्यासाठी तिने आपलं घरही विकलं. कायदेशीर कारवाईचा खर्च करण्यासाठी ती सक्षम नाही.

हा सिनेमा हिंदीत बनवण्यासाठी मी 40% हक्क घेतले होते. गाण्यांचं संगीत आणि पटकथा लिहिण्यासाठीही गुंतवणूक केली होती. आम्ही ‘आरती – द अननोन लव्ह स्टोरी’चं हिंदी व्हर्जन बनवणार होतो. पण त्याआधी ‘ऑक्टोबर’ प्रदर्शित झाला. आम्हाला न्याय हवा. मी या लढाईत सारिकाची मदत करणार आहे.”

निर्मात्यांनी आरोप फेटाळले

‘ऑक्टोबर’च्या निर्मात्यांनी कॉपी असल्याचे आरोप फेटाळले आहेत. “ऑक्टोबरवर झालेले कॉपीराईटचे आरोप आम्ही समजू शकतो. पण आम्ही क्रिएटिव्ह लोक आहोत. कामावर आणि आमच्या टीमवर आम्हाला विश्वास आहे. या टीमने पिकू, पिंक यांसारखे दमदार चित्रपट केले आहेत. आम्ही आरती सिनेमाबद्दल फारसं ऐकलेलं नाही आणि संपूर्ण प्रकरण काय आहे, हेदेखील माहित नाही. संबंधित चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्ही ह्या प्रकरणात लक्ष घालू,” असं परिपत्रक ऑक्टोबरचे सहनिर्माती कंपनी रायझिंग सन पिक्चर्सने जारी केलं आहे.