BJP चे 15 ते 20 आमदार NCP च्या संपर्कात ! भाजपाच्या ‘या’ आमदारानं शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीपूर्वी 30 हून अधिक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. तर काँग्रेसमधीलही अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. यापैकी अनेक नेते पराभूत झाले असून काही नेत्यांचा विजय झाला आहे मात्र भाजपमध्ये त्यांना तितकस महत्व मिळत नाहीये त्यामुळे अशा अनेकी गयारामांना पुन्हा राष्ट्रवादीचे वेध लागले असल्याची चर्चा आहे. त्यातच पक्षांतर करून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले होते.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आधी काँग्रेसवासी असलेले मात्र नंतर भाजपमध्ये जाऊन निवडणूक आलेले जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात भाजपला मोठी गळती लागणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर राज्यात शिवआघाडीचे भवितव्य ठरणार आहे. तत्पूर्वी राज्यपालांशी होणारी शनिवारची भेट रद्द करून नंतर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

 

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like