शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवंय भाजपचं सरकार, उध्दव ठाकरेंकडून मनधरणीचे प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपत घेतली. महाराष्ट्रात झालेल्या या राजकीय भूकंपामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर इतर पक्षांनी आपले आमदार फुटू नहेत यासाठी हालचाल करायला सुरुवात केली. शिवसेनेने देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. मात्र शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना भाजपसोबत युती हवी आहे कारण रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये काही आमदारांनी आपण भाजप सोबत जाऊ शकत नाही का अशी विचारणा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे त्या आमदारांची समजूत काढत होते अशी देखील माहिती सध्या मिळते. आमदारांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे रात्री मातोश्रीवर परत न जाता आदित्य ठाकरे हॉटेलमध्येच थांबले असल्याचे समजते. आमदारांचा घोडेबाजार होऊ नहे यासाठी शिवसेनेने आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवलेले आहे.

सर्वोच्च न्यायालय उद्या देणार अंतिम निर्णय
काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती, त्याबाबतची सुनावणी आज होणार होती. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये भाजपच्या वकिलांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीसहित अपक्ष अशा एकूण १७० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगितले. दोनीही पक्षांच्या वतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला गेला. त्यानंतर न्यायालयाने अखेर उद्या सकाळी 10.30 वाजता या निर्णयाबाबतचा अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com