जम्मू-काश्मीर : 15 विदेशी राजदूतांना भेटण्यासाठी गेलेल्या नेत्यांना मेहबूबा मुफ्तींनी PDP मधून हाकललं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्यानंतर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ आय जस्टर यांच्यासह १५ देशांचे मुत्सद्दी गुरुवारी श्रीनगर येथे दाखल झाले. मुत्सद्दी लोकांच्या भेटीला सुरुवात झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत सरकारकडून १५ राजदूतांना काश्मीर दौऱ्यावर नेण्यात आले. हा मार्गदर्शित दौरा नाही. यामध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, बांगलादेश, मालदीव, मोरोक्को, फिजी, नॉर्वे, फिलीपिन्स, अर्जेंटिना, पेरू, नायजेरिया, टोगो आणि गुआनाच्या राजदूतांचा समावेश आहे.

ते म्हणाले की, राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांशी प्रथम बैठक झाली. सर्वांनी दहशतवादाला शांततेसाठी धोका दर्शविला. कुमार म्हणाले की राजनयिकांच्या भेटीचा हेतू म्हणजे सरकारद्वारे केलेले प्रयत्न त्यांनी स्वतः बघावे.

युरोपियन युनियनशी संबंधित प्रश्नांवर दिलेली उत्तरे
ही टीम शुक्रवारी जम्मू येथे पोहचणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली. ते म्हणाले, ‘दिल्लीत उपस्थित काही राजनयिकांनी जम्मू-काश्मीरला जाण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. रवीश कुमार म्हणाले, ‘राजनयिकांनी नागरी संस्था, स्थानिक मीडिया आणि स्थानिक नेत्यांची भेट घेतली.’

युरोपियन युनियनच्या मुत्सद्दी राजनयिकांचा या भेटीत सहभाग नसल्याबद्दल विचारले असता कुमार म्हणाले, “त्यांना एका गटामध्ये जायचे होते.” ते म्हणाले की सुरक्षेच्या कारणास्तव मुत्सद्दी लोकांचा गट वाढवता येणार नाही. बर्‍याच मुत्सद्दींनी असेही सांगितले की त्यांना यापूर्वी याची कल्पना नव्हती. अशी भेट पुढे घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करू.

इराणवर देखील दिले उत्तर
इराण आणि अमेरिकेच्या प्रश्नावर कुमार म्हणाले की आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमच्यासाठी प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता अत्यंत महत्वाची आहे. आम्हाला आवडेल की वादग्रस्त परिस्थिती लवकरात लवकर संपली पाहिजे. ते म्हणाले, “चाबहार प्रकल्पाचे महत्त्व अमेरिकेने नुकतेच समजून घेतले. संपूर्ण गोष्ट आपल्यावर कसा परिणाम करते, हे आपण पहावे लागेल. परंतु, अमेरिकेच्या चाबहार बंदरातील निर्बंधांमधून शिथिल केल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.”

जम्मू-काश्मीरच्या अनेक प्रमुख देशांच्या मुत्सद्द्यांच्या भेटीबद्दल काॅंग्रेसने गुरुवारी सरकारवर निशाणा साधला होता आणि ते म्हणाले की, ‘गाईडेड टूर’ थांबली पाहिजे आणि केंद्रशासित प्रदेशात अर्थपूर्ण राजकीय उपक्रम सुरू केले पाहिजेत.

नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, आमचा आक्षेप राजनयिकांच्या या भेटीविषयी नाही. आमचा आक्षेप असा आहे की जेव्हा आपले नेते आणि खासदार जम्मू काश्मीरला जाऊ शकत नाहीत तेव्हा इतर देशांच्या राजदूतांना पाठण्यात काय अर्थ आहे ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/