15 Aug Flag Hoisting | पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 15 Aug Flag Hoisting | एकनाथ शिंदे सरकारचा (Eknath Shinde Government) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही तसेच पालकमंत्री (Guardian Minister) नेमले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वतंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख शासकीय कार्याक्रमात ध्वजारोहण केले जाते. परंतु अद्याप मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप केले नसल्याने 15 ऑगस्टला कोणता मंत्री कोठे ध्वजारोहण (15 Aug Flag Hoisting) करणार याची उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांसह (CM) 20 मंत्री असल्याने इतर 16 जिल्ह्यात विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) अथवा संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) यांच्यावर ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

बहुतांश नेत्यांना त्यांचेच जिल्हे देण्यात आले आहेत. आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार का याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता पुण्याची (Pune) होती. कारण पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदारी घेणार असल्याची चर्चा होती. तसे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संकेत देखील दिले होते. मात्र, प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे नागपूर (Nagpur) आणि चंद्रकांत पाटील हे पुण्यात ध्वजारोहण (15 Aug Flag Hoisting) करणार आहेत.

 

कोणता नेता कोठे ध्वजारोहण करणार

1. देवेंद्र फडणवीस – नागपूर
2. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) – चंद्रपूर (Chandrapur)
3. चंद्रकांत पाटील – पुणे
4. राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) – अहमदनगर (Ahmednagar)
5. गिरीश महाजन (Girish Mahajan) – नाशिक (Nashik)
6. दादा भुसे (Dada Bhuse) – धुळे (Dhule)
7. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – जळगाव (Jalgaon)
8. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) – ठाणे (Thane)
9. मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) – मुंबई उपनगर (Mumbai Suburb)
10. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) – सिंधुदुर्ग (Sindhudurg)
11. उदय सामंत (Uday Samant) – रत्नागिरी (Ratnagiri)
12. अतुल सावे (Atul Save) – परभणी (Parbhani)
13. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) – औरंगाबाद (Aurangabad)
14. सुरेश खाडे (Suresh Khade) – सांगली (Sangli)
15. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) – नंदुरबार (Nandurbar)
16. तानाजी सावंत (Tanaji Sawant) – उस्मानाबाद (Osmanabad)
17. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) – सातारा (Satara)
18. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – जालना (Jalna)
19. संजय राठोड (Sanjay Rathod) – यवतमाळ (Yavatmal)

 

अमरावती येथे विभागीय आयुक्त ध्वजारोहण करतील

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

 

Web Title :- 15 Aug Flag Hoisting | the list of ministers announced for flag hoisting in various districts cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा