एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बस जळून खाक ; १५ जण जखमी, ५ गंभीर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर विद्यापीठाजवळ एस टी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन त्यात एस टी बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पहाटे पाच वाजता घडला़ जखमींवर सोलापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

तेलंगणाची ही बस हैदराबादकडून सोलापूरला आली होती. सोलापूरहून ती पंढरपूरकडे जात होती. सोलापूर विद्यापीठाजवळ बसने रस्त्यावर थांबलेल्या बॅटरीने भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. धडक बसल्यानंतर बसने पेट घेतला. झोपेत असलेल्या प्रवाशांना प्रारंभी या आगीची कल्पना आली नाही. त्यामुळे त्यात १५ जण भाजून जखमी झाले. बसचा चालक आणि वाहकावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून इतरांवर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातातील जखमींची नावे : अस्लम महेबूब सलगर (वय २७, रा. चारमिनार, हैदराबाद), अजमेर रामय्या भिक्कु (वय ३२, रा. हैदराबाद), यादय्या रामलू गोपीन (वय ४७, रा. रवी चेडू केसम पेठ, महेबूब अपार्टमेंट, हैदराबाद), रणधीरसिंग मनोहरसिंग दीक्षित ( वय ४८, रा. वायएमसीए नारायण गुडा, हैदराबाद), अस्लम सय्यद (वय ३५, रा. तलाफ कट्टा, हैदराबाद), नारायणसिंग राजपूत (रा. बीएचईएल, हैदराबाद), मीना राजपूत़