पुणे : तरुणाकडून चलनातून बाद झालेल्या १५ लाखांच्या नोटा जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने न्यू राधाकिशन प्लॉट येथील रेड डोअर कॅफेमध्ये केली.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07f0e50e-b99a-11e8-ac81-d3d4cb41f896′]

पुणे जिल्ह्यातील दाैंड येथील रहिवासी सूरज सुनील सोनवणे (वय २५) व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाळापूर फैलातील रहिवासी प्रकाश नथ्थुजी मोरे (वय ३५) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

सोनवणे आणि मोरे हे दोघे चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन न्यू राधाकिशन प्लॉट येथील एका कॅफेत बसलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यांनी कॅफेत येऊन संशयितांची तपासणी सुरू केली असता प्रकाश मोरे व सूरज सोनवणे या दोघांच्या हालचालीवरून त्यांच्याकडे नोटा असल्याची खात्री झाली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर दोन्ही आरोपींनी चलनातून बाद झालेल्या नोटा बॅगेत असल्याची कबुली दिली.
[amazon_link asins=’B077ZXRB5W,B07G26PLDJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0da79ade-b99a-11e8-92b2-df2b96e861e9′]

पोलिसांनी त्यांच्याकडून चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १४६ नोटा म्हणजेच एक लाख ४६ हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या २ हजार ७०८ नोटा म्हणजेच १३ लाख ५४ हजार रुपये अशा एकूण १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्पेसिफिक बँक नोटा अ‍ॅक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, रणजितसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, भावलाल हेंबाडे यांनी केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.