‘कोरोना’च्या विळख्यात 15 मंत्री, डझनभर सनदी अधिकारी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचे थैमान वेगाने वाढत असतानाच मंत्री आणि सनदी अधिकार्‍यांमध्ये बाधा वाढत आहे. लॉकडाउननंतर शिथिलीकरणात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती 100 टक्के करण्यावरून सरकार आणि अधिकारी यांच्यातील वाद रंगला आहे. अशातच 15 मंत्र्यांसह डझनभर अधिकार्‍यांना बाधा झाल्यामुळे मंत्रालय हे कोरोनाचा नवे केंद्रबिंदू ठरले आहे.

आतापर्यंत ठाकरे सरकारमधील 43 पैकी 15 मंत्री तसेच डझनभर अधिकारी कोरोना बाधित झाल्याने मंत्रालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात विशेषत: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खबरादरीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय प्रवेश बंद करण्यात आला होता. मंत्री, सचिव, काही उपसचिव यांच्याशिवाय फारसा कोणाला प्रवेश दिला जात नव्हता.

तरीही काही अधिकारी- कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांतर सचिवांचे निवासस्थान असलेल्या शासकीय इमारतींमध्येही कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. राज्यात आतापर्यंत 15 मंत्र्याना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 10 मंत्री करोनामुक्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झालेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड कोरोना बाधित झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like