Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा पाठिंबा; कोल्हापूरनंतर नाशिकला होत आहे दुसरे मुक आंदोलन

नाशिक :पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | सकल मराठा क्रांती मोर्चा ( Maratha Kranti Morcha) च्या वतीने आज नाशिक येथे मूक आंदोलन (Movement) होणार आहे. कोल्हापूर (Kolhapur) नंतर नाशिक (Nashik) येथे हे दुसरे आंदोलन आहे. छत्रपती संभाजी राजे ( Chhatrapati Sambhaji Raje) या आंदोलनात सहभागी होणार असून नाशिकमधील १५ आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून आंदोलकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक आंदोलकांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली आहे. आंदोलनस्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत.

File photo

काही वेळातच छत्रपती संभाजी राजे आंदोलनस्थळी पोहचणार आहेत. ते दुपारी १ वाजेपर्यंत येथे आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनस्थळी येणार्‍या आंदोलकांसाठी नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एका ठिकाणी करण्यात आली आहे.

या आंदोलन स्थळावर आता आमदार व लोकप्रतिनिधी येण्यास सुरुवात झाली आहे. आमदार नितीन पवार आणि आमदार राहुल ढिकले यांचे मूक आंदोलनस्थळी आगमन झाले आहे. रयत क्रंती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या मूक आंदोलनस्थळी आगमन झाले आहे. या आंदोलनात पुरुषांबरोबरच महिला, तरुणींही सहभागी झाल्या आहेत. अनेक महिला काळ्या साडी नेऊन आलेल्या दिसून येत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : 15 MLAs support Maratha reservation movement; After Kolhapur, Nashik is witnessing another silent movement

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी