धक्कादायक ! १५ पोलीस कर्मचारी ‘Doping Test’ मध्ये फेल ; कॉन्स्टेबल घेऊन आला चक्क पत्नीचे ‘युरीन सॅम्पल’

अमृतसर : वृत्तसंस्था – पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात ज्यामुळे आपण आपल्या घरात आरामात राहू शकतो. मात्र हेच पोलीस व्यसनाधीन होऊन ड्युटी करत असतील तर? होय, पंजाब पोलीस खात्यात आज झालेल्या वार्षिक वैद्यकीय तपासणी दरम्यान १५ पोलिस डोप टेस्टमध्ये दोषी आढळले. याहून धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एका कॉन्स्टेबलने आपल्या लघवीचे नमुने बदलत चक्क पत्नीचे युरीन सॅम्पल दिले. गुरुवारी पोलिसांनी सांगितले की नुकतीच २५ पोलिसांची वार्षिक वैद्यकीय तपासणी केली गेली. यापैकी १५ जणांना डोप टेस्ट घेण्यास सांगण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीत पॉसिटीव्ह आढळले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोषी आढळलेल्या सर्व १५ पोलिसांना अमृतसरच्या स्थिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, एका कॉन्स्टेबलने वार्षिक वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याच्या लघवीचा नमुना बदलल्याचे आढळले. याचे कारण म्हणजे कॉन्स्टेबलला नमुन्याचे निकाल सकारात्मक असतील अशी भीती वाटली. या हवालदाराला त्याच्या एका नातेवाईकांसोबत नमुना बदलल्याबद्दल निलंबित करण्यात आले.

यासंदर्भात विचारले असता अमृतसर (ग्रामीण) वरिष्ठ पोलिस अधीक्षक विक्रमजीतसिंग दुग्गल यांनी सांगितले की, हवालदाराविरूद्ध तपास सुरू करण्यात आला आहे.

डोपिंगमध्ये असणारी औषधे पाच वेगवेगळ्या प्रकारात विभागली जातात. स्टिरॉइड्स, पेप्टाइड हार्मोन्स, नार्कोटिक्स, डाइयूरेटिक्स आणि ब्लड डोपिंग या प्रकारांतील नशेची औषधे सेवन केल्यास त्यांच्या लघवीचे नमुने तपासणीत पॉसिटीव्ह आढळतात. आज घडलेल्या घटनेने पंजाबातील पोलीस मोठ्या प्रमाणावर नशेच्या पदार्थांचे सेवन करत असल्याचे स्पष्ट होते.

Visit – policenama.com 

 

You might also like