महाराष्ट्रदिनी १५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस दलातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने महाराष्ट्र दिनी सन्मानित करण्यात आले. पुणे शहर पोलीस आय़ुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त डॉ. पद्मनाभन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. राज्यात दरवर्षी ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला जातो. १ मे च्या दिवशी त्या त्या घटकप्रमुखांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातो. त्याप्रमाणे पुणे पोलीस दलातील १५ अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक – सुनील तांबे,

पोलीस उपनिरीक्षक – अभिजीत शरद मोरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक संतराम पांडूरंग गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक – रमेश महादेव भोसले, विलास बाबूराव जाधव, अविनाश मोहन शिंदे, रमेश सीताराम घोडे,

पोलीस हवालदार – विनायक सुरेश पाठक, संतोष विठ्ठल जगताप, गौरीशंकर पंढरीनाथ कुलकर्णी, विनोद विलास भंडलकर,

पोलीस नाईक – बाबासाहेब शंकर कर्पे, किशोर शिवाजी कुंभार

पोलीस शिपाई – रविंद्र जिजाबा साबळे, रविंद्र काकासो जगताप

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like