मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होत असून आतापर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई 1 व ठाणे 1 असे 2 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2020
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यानंतर आता आकडा 124 वर गेला आहे. परंतु तरी रोज रुग्ण वाढत असताना आजपर्यंत 15 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता लॉकडाईनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपवाद वगळता काही ठिकाणी लोक रस्त्यावर येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक गर्दी करत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्यात असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात येत आहे.