गो रक्षा शाळेत ‘वेठबिगारी’ करणाऱ्या 15 जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – गो रक्षा करुन सेवा करत असल्याचा देखावा करणाऱ्याने प्रत्यक्षात गो शाळेत पगार न देता कामगारांकडून तब्बल ७ वर्षे वेठबिगारी करुन घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले. येथील १५ कामगारांची शासनाने सुटका केली आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी हनुमंत मारुती गराडे (वय ४१, रा़ धामणे, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हनुमंत गराडे याने २०११ मध्ये संत तुकाराम गो शाळा सुरु केली. या ठिकाणी त्याने ३० कामगारांना १२ लाख ५० हजार रुपये देऊन कामाला ठेवले होते. २०१२ मध्ये त्यातील १५ कामगार काम सोडून निघून गेले. उरलेल्या १५ कामगारांना धामणे येथील गो शाळेत तो काम करायला सांगत. त्या सर्वांना दर महिन्यांचे रेशन देत असत. त्यामुळे त्यांची खाण्या पिण्याची सोय होत होती.

परंतु, तो या कामगारांना कोणताही पगार देत नव्हता. याबाबत या कामगारांनी इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेकडे तक्रार केली. या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या कामगारांची सुटका करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर इंटरनॅशनल जस्टी मिशन या संस्थेचे सदस्य, कामगार उपायुक्त व मावळचे तहसीलदार यांनी धामणे येथील संत तुकाराम गो शाळेला भेट दिली. तेथील कामगारांची भेट घेतली. त्यांनी आपल्याला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. त्यावरुन मावळ तहसीलदारांनी त्यांनी सुटका केली असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेठबिगार पद्धत निर्मुलन अधिनियम कायद्यानुसार हनुमंत गराडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/