नगर तालुक्यासह १५ तहसिलदारांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील १५ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील चार जणांना जिल्ह्यातच नियुक्ती मिळाली, असून ११ जण जिल्ह्याबाहेर गेले आहेत. बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या १० अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता १५ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याबाहेर बदलून गेलेले तहसीलदार
अनिल दौंडे : राहुरी तहसीलदार ते नाशिक तहसीलदार, राहुल कोताडे : तहसीलदार सामान्य प्रशासन नगर ते तहसीलदार सिन्नर, जितेंद्र इंगळे : सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी नगर ते तहसीलदार बागलान, जि. नाशिक, मनीषा राशिनकर : अन्नधान्य वितरण अधिकारी ते धान्य वितरण अधिकारी नाशिक, अप्पासाहेब शिंदे : नगर तहसीलदार ते सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक, हेमा बडे : महसूल तहसीलदार ते धान्य वितरण अधिकारी मालेगाव, सदाशिव शेलार : तहसीलदार संगायो जिल्हाधिकारी कार्यालय नगर ते तहसीलदार संगायो मनपा क्षेत्र नाशिक, राजेंद्र थोटे : पुनर्वसन तहसिलदार ते नंदुरबार  तहसिलदार, गणेश मरकड : पारनेर तहसिलदार ते भडगाव तहसिलदार, जि. जळगाव, किशोर कदम : कोपरगाव तहसीलदार ते चाळीसगाव तहसीलदार, सुभाष दळवी : तहसीलदार श्रीरामपूर ते  संगोया तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.

जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले
महेश शेलार : सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक ते तहसीलदार पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय, ज्योती देवरे : मालेगाव तहसीलदार ते नगर भूसुधार तहसीलदार, प्रवीण चव्हाणके : चिटणीस नंदुरबार ते पारनेर तहसीलदार, योगेश चंद्रे- तळोदा तहसीलदार ते कोपरगाव तहसिलदार, सी. एम. वाघ :भडगाव तहसीलदार ते कर्जत तहसिलदार, अमोल निकम : जळगाव तहसीलदार ते संगमनेर तहसीलदार, प्रशांत पाटील : सहायक पुरवठा अधिकारी धुळे ते श्रीरामपूर तहसिलदार, सुनील सैंदाणे : संगायो जि. का. जळगाव तहसिलदार ते सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी नगर, मनोज देशमुख : तहसीलदार लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव ते तहसीलदार संगायो जिल्हाधिकारी कार्यालय, ऋषिकेश सुराणा : धुळे चिटणीस ते नेवासा तहसिलदार, नरेशकुमार बहिरम : अप्पर तहसीलदार पिंपळनेर ते तहसीलदार जिल्हा निवडणूक शाखा

जिल्ह्यातच बदली झालेले तहसीलदार
सुधीर पाटील : नेवासा ते महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, उमेश पाटील : जिल्हा निवडणूक शाखा ते नगर तालुका तहसीलदार, किरण सावंत : कर्जतचे तहसिलदार ते अन्नधान्य वितरण अधिकारी, मोहम्मद शेख :  भूसुधार तहसीलदार ते राहुरी तहसीलदार